Honeytrap: आजी माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात; बड्या नेत्याचा दावा, महिलेनं व्हिडिओसकट दाखल केली तक्रार

Nashik Honeytrap News: नाशिक दौऱ्यात एका बड्या नेत्याने गौप्यस्फोट करत राज्यातील ७२ अधिकारी आणि नेते हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
Nashik Honeytrap
Nashik Honeytrapx
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या बड्या नेत्यानं अनौपचारिक गप्पांदरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

संबंधित नेत्यानं पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी, तसेच काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. यात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ हनी ट्रॅपचा भाग आहे की, राजकीय नेत्याची रासलीला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही'.

Nashik Honeytrap
Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

नाशिकमधील पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असल्याचा दावा संबंधित नेत्यानं केलाय. यासंदर्भात एका महिलेनं नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समोर असल्यामुळे कुणीही हनीट्रॅपबाबत उघडपणे बोलण्यास तयार नाही. याकारणामुळे हे संपूर्ण प्रकरण गुलदस्त्यात आहे.

Nashik Honeytrap
Shocking: मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत 'नको ते घडलं'; परिसरात खळबळ

राजकीय - प्रशासकीय वर्तुळात खळबळ

बड्या नेत्यानं केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणात फक्त नाशिक नाही तर, मुंबई आणि पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हनी ट्रॅपमध्ये नेमके कोणते आणि किती अधिकारी अडकले? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होईल, असं देखील बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com