Uddhav Thackeray and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेंच्या दौऱ्याआधी ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोकणातील प्रमुख नेत्यांची हकालपट्टी

Major leaders expelled from Thackeray group in Ratnagiri: रत्नागिरिसह संपूर्ण कोकणात ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याआधी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Saam Tv

रत्नागिरी: ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे राजन साळवी यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनते प्रवेश केला आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्याने कोकणात ठाकरे गटाला मोठी खिंडार बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशातच आता नाशिक नंतर कोकणात ऑपरेशन टायगर हे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राजेंद्र महाडीक यांची हकालपट्टी

ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळुण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरीत उबाठाला गळती

रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यातही तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून विजयी झाले. अशातच एकनाथ शिंदेंचा दौरा पक्षाला अधिकच ताकद देणारा ठरू शकतो. राजन साळवी यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाला मोठी खिंडार बसली आहे. त्यातच आज प्रमुख नेत्यांसह 150 हून अधिक नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT