Samruddhi Highway Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर मिनी बसला भीषण अपघात; देवदर्शनाहून परतताना 12 भाविकांचा मृत्यू, 23 जखमी

Samruddhi Mahamarg Chhatrapati Sambhajinagar Accident News : समृद्धी महामार्गावर (वैजापूर) अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान ट्रकला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात झाला.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar :

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनावरून परतताना झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खाजगी टम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात हा भीषण अपघात झाला.

समृद्धी टोल नाक्यावर पोलिसांनी एक ट्रक थांबवण्यासाठी, बाजूला घेत होते. त्याच वेळेस मागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  (Latest Marathi News)

अपघातानंतर तत्काळ वाहतूक पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरु केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

मात्र अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 12 जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य 23 जण जखमी झाले.

काही जण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांनाअधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : तेजस्वी घोसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

Bigg Boss Marathi 6 : नॉमिनेशन टास्कमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; कोणी कापली कोणाची पतंग? थेट 9 सदस्य नॉमिनेट

SCROLL FOR NEXT