CM Devendra Fadnavis news  Saam Tv
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra fadnavis news : नागपुरातील हिवाळी अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

Vishal Gangurde

हिवाळी अधिवेशनात १८ विधेयके मांडण्याची तयारी सरकारकडून पूर्ण झाली आहे

लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य केली

विदर्भ–मराठवाड्याच्या प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले

नागपूर : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. राज्यातील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस पुढे म्हणाले, 'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यांमध्ये अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. केवायसी या प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत दिली जाईल. अतिरिक्त १० हजार रुपयांची मदत तसेच खरडून गेलेल्या जमिनी, विहिरी आदींसाठी स्वतंत्र मदत दिल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.

शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येणार आहे. या अधिवेशनात दररोज १० तासांहून अधिक कामकाज करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. या अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित अधिकाधिक प्रश्नांवर चर्चा होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले. दावोससह विविध मंचांवर झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात येत आहेत. हे उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांचे प्रश्न सोडवणे हाच शासनाचा अजेंडा -उपमुख्यमंत्री शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, 'महायुती सरकारने लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णय घेतलेत. या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवणे हाच शासनाचा अजेंडा असणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेती, सिंचन, आरोग्य, रोजगार निर्माण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : नंदुरबारमध्ये आयशर टेम्पो आणि ट्रकची भीषण धडक, रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या जखमींना देवदूतचा हात

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे २७०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांती स्पेशल तीळ बाजरीची भाकरी बनवा, वाचा सोपी पद्धत

Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT