Police Van Accident In Pandharpur Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Accident: आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला भीषण अपघात, ३ जण गंभीर जखमी

Police Van Accident In Pandharpur: पंढरपूमध्ये तिहेरी अपघात झाला. आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More
  • पंढरपुरमध्ये भीषण अपघाताची घटना

  • पोलिस व्हॅनची २ वाहनांना धडक

  • तिहेरी अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी

  • चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

भरत नागणे, सोलापूर

पंढरपुरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला भीषण अपघात झाला. पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये पोलिस व्हॅनच्या चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत. अपघातामध्ये पोलिस व्हॅनचे मोठं नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर आज मोठा अपघात झाला. आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी पोलिस व्हॅन अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार व्हॅनचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. या व्हॅनने समोरून येणाऱ्या दुचाकी आणि कारला जोरदार धडक दिली. या तिहेरी अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले.

अपघात इतका भीषण होता की, पोलिस व्हॅन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन झाडीजवळ आदळली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून पोलिस व्हॅनचा चालकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हॅनमध्ये असलेल्या आरोपींना तातडीने दुसऱ्या वाहनातून न्यायालयात रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूनला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT