Aurangabad Gangapur Car Accident News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Accident : औरंगाबादमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघात ४ जणांचा मृत्यू

गंगापूर रोडवरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

औरंगाबाद : औरंगाबादेतून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. (Aurangabad Gangapur Car Accident News)

अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील (Aurangabad) कायगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणारी स्वीफ्ट कार आणि वॅग्नर कारमध्ये हा अपघात झाला आहे. (Maharashtra News)

अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अपघातात अक्षरश: चुराडा झाला. स्विफ्ट कारमध्ये औरंगाबाद येथील बजाजनगरमधील प्रवासी, तर वॅग्नरमध्ये अमरावती येथील प्रवासी होते, अशी प्राथामिक माहिती स्थानिकांनी दिली आहे.

ऐन वर्दळीच्या रस्त्यात हा अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांना तसेच जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT