MONSOON SET TO ENTER MAHARASHTRA WITHIN HOURS; IMD ISSUES YELLOW ALERT FOR SATARA AND KOLHAPUR Saam tv
महाराष्ट्र

Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Alisha Khedekar

  • पुढील काही तासांत महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री

  • सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

  • राज्यातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

  • मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज

Maharashtra Weather Update Today 6th June राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! गेले काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळाला.त्यामुळे नागरिक गरमीने त्रस्त झाले होते. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने आगेकूच करत गोव्यात धडक दिली असून, महाराष्ट्रातही पुढील काही तासांत त्याचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात मॉन्सूनच्या आगमनाला पोषक हवामान तयार होत असून, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. आज कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील इतर अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मॉन्सूनने केरळमध्ये (Kerala Monsoon ) ४ जून रोजी प्रवेश केला. यंदा त्याचे केरळमधील आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिरा झाले. शुक्रवारी (५ जून) मॉन्सूनने गोव्याचा (Goa Monsoon Update ) काही भाग व्यापला असून, पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्येही प्रगती केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनची सीमा सध्या पणजी, बंगळूर, सालेम ते पंबन बेट या भागांपर्यंत पोहोचली आहे. पुढील तासांत तळ कोकणासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update) राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मृतदेह सापडला नाही तरी आरोपी दोषी ठरू शकतो; हत्येच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

पाणी प्यायल्यानंतर ही लक्षणे दिसली तर समजा किडनीत काहीतरी गडबड आहे

Political News: मोदी सरकारचे मिशन -३६०, ६ खासदारांची जुळवाजुळव कशी करणार? NDA चं टेन्शन वाढलं

तुळशीची माळ घालण्याचे नियम काय? कोणी घालावी आणि कोणी घालू नये?

Maharashtra News Live Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरातील पर्यटक मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींना न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT