Lord Ram Worship saam tv
महाराष्ट्र

MP Ramdas Tadas: जानवं-सोवळं नाही, देवदर्शन नाही; माजी खासदारालाच रामाची पूजा नाकारली

Lord Ram Worship: देशभरात रामनवमी जल्लोषात साजरी झाली. मात्र जानवं आणि सोवळं नसल्यानं भाजपच्या माजी खासदारालाच रामाचं दर्शन घेण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पुरोगामी महाराष्ट्रात हा प्रकार कुठे घडलाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्टमध्ये.

Girish Nikam

एकीकडे माणूस थेट मंगळावर जाण्याच्या गोष्टी करत असताना स्वत:ला पुरोगामी म्हणणाऱा महाराष्ट्र मात्र अजूनही जानवं-सोवळ्यात अडकल्याचं दिसतयं.तशी घटनाच राज्यात घडलीय. सोवळं आणि जानवं धारण न केल्यानं वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला.

तडस यांच्यावर बाहेरूनच पूजा करण्याची वेळ आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. वर्ध्यातल्या देवळी इथल्या राम मंदिरातला हा गंभीर प्रकार आहे. या घटनेनं संतापलेल्या माजी खासदार तडस यांनी मंदिराच्या ट्रस्टींची आणि सर्व व्यवहारांच्या चौकशीची मागणी केलीय.

रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही मंदिरात दर्शनासाठी आले होते. रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे होते. त्यावेळी मंदिराच्या गर्भगृहात पूजा सुरु होती. रामदास तडस यांनी गर्भगृहात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली. तुम्ही जरा लांबच राहा, तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही. तुम्ही सोवळे नेसलेले नाही.

नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही, बाहेर निघा, असे मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटल्याने रामदास तडस संतापले. यानंतर रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. वर्ध्यातील या प्रकारानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वर्षानुवर्षे बंद होतं. ते सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं होत.

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता. असा इतिहास असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातील मंदीर अजूनही जानवं-सोवळ्यात अडकत असतील तर ही खेदाची बाब आहे. प्रत्येक मंदिराचे नियम असतात हे मान्य असंल तरी केवळ सोवळं नसल्यानं भक्तांना पूजा करण्याचा अधिकारच नाकारला जात असेल तर याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT