Narayan Rane Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Narayan Rane on Uddhav Thackeray : नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महायुतीवर मोठं भाकीत केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राणेंनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीचा प्रचाराची अवघ्या काही तासांत सांगता होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांची लगबग वाढली आहे. या दोन दिवसांनंतर मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्यामुळे यंदा सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असणार आहे. याचदरम्यान, निवडणुकीत महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमदेवार जिंकतील, याचा आकडा खासदार नारायण राणे यांनी सांगितला आहे.

खासदार नारायण राणे यांनी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील, यावर राणेंनी मोठं भाष्य केलं आहे. नारायण राणे म्हणाले, 'राज्यातील सर्व क्षेत्रातील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना-भाजप युती जिंकेल. महायुती १६१ पेक्षा जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्विवाद युतीची सत्ता येईल'.

'विक्रोळीमध्ये संजय राऊत यांचे भाऊ लढत आहेत. २३ तारखेला निकाल काय येईल, तो समजेल. पण राऊत यांनी जे शब्द वापरले आहेत. ते शोभनीय नाहीत. तो शब्द मी वापरू इच्छित नाहीत. उद्धव ठाकरे यांचं फक्त २५ आमदार निवडून येतील, असे नारायण राणे पुढे म्हणाले.

'सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांकडून पाकीट वाटली जात आहेत. काही मतदारसंघात काही जणांना पाठवत आहेत. या विषयावर मार्गही निघू शकतो. आम्ही आज आणि उद्याची रात्र पूर्णपणे पेट्रोलिंग करणार आहोत, असे राणेंनी सांगितले.

नारायण राणे यांनी माझ्यासोबत पेट्रोलिंग करावं, वैभव नाईक यांचे खुलं आव्हान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाकिटांचे वाटप होत आहे. या संदर्भात रात्री पेट्रोलिंग करणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत आज नारायण राणे यांनी दिली होती. मात्र राणेंच्या या आरोपाचे खंडन करताना राणे जर म्हणत असतील की पैशांचं वाटप होत आहे. आपण पेट्रोलिंग करणार आहोत, तर नारायण राणे यांनी माझ्या सोबत पेट्रोलिंग करावं. मी त्यांच्या सोबत पेट्रोलिंग करण्यास तयार आहे, असं खुलं आव्हान विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी दिल आहे. त्यामुळे पाकीट वाटपावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT