Eknath Shinde News Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

CM Eknath Shinde News in Marathi:

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून युत्या-आघाड्यांसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. 'आम्ही एकजुटीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेची निवडणूक लढू, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारशी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाच्या मेळाव्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलले आहे. पुढची लोकसभा आणि विधानसभा महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून लढवणार आहोत. लोकसभेत राज्यातून मोदींना 45 जागा जिंकून देणार आहोत'.

'आम्ही एकजुटीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेची निवडणूक लढू. त्याच्या अनुषंगाने अजित पवारांनी भाष्य केलं आहे. पुढच्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून मिळूनच लढू. 2024 मधील विधानसभा निवडणूक ही महायुती मिळूनच लढेल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं. 'पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT