Tensions rise in Bhandara as BJP and Shiv Sena leaders clash ahead of civic elections saam tv
महाराष्ट्र

आणखी एका ठिकाणी महायुतीत फूट? भंडाऱ्यात भाजप-शिवसेनेत वाद टोकाला

BJP vs Shiv Sena in Bhandara : महायुतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भंडारा येथे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाद पटेलाय. यामुळे महायुतीमध्ये फूट निर्माण झाली आहे. परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्यातील वाद कशामुळे निर्माण झाला ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • भंडाऱ्यात भाजप–शिवसेनेच्या वाद निर्माण झालाय.

  • परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्यात वाद झाला.

  • निवणडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आरोप-प्रत्यारोप

मालवणनंतर आता भंडाऱ्यात महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलीय. येथेही भाजपविरूद्ध शिवसेना अशी लढाई सुरू झालीय. परिणय फुके आणि नरेंद्र भोंडेकर यांच्यातील वाद काही मिटताना दिसत नाहीये. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात तर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे.

नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सत्ताधारी विरोधक आमने सामने येण्याऐवजी अनेक ठिकाणी महायुतीमधील तिन्ही पक्ष आमने-सामने आलेत. भंडाऱ्यात महायपुतीतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.

भंडारा नगरपरिषदेमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने भाजपकडून भोंडेकरांना लक्ष करण्यात येत आहे. आमदार परिणय फुकेंनी भंडाऱ्यातील विविध भ्रष्टाचार बाहेर काढत, भोंडेकरांवर आरोप केले. भर प्रचारसभेत त्यांनी भोंडेकरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला. परिण फुकेंच्या इशाऱ्यानंतर भोंडेकरही आक्रमक झाले आहेत. आपल्या मतामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसलाय. जर भाजप आमदार आरोप करणार असतील तर आम्हीही युतीधर्म विसरू असा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे. त्याला पुन्हा परिणय फुकेंनी प्रत्युत्तर दिलंय.

अशीच स्थिती मालवणमध्ये पाहायला मिळतेय. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही निलेश राणेंवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी निलेश राणेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं. कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे म्हणत शिंदेंनी निलेश राणेंना दहा हत्तींचे बळ दिलं.

निलेश राणेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकत पैशांची बॅग पकडली होती. त्यानंतर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर चव्हाण आणि राणे यांच्यात वाद वाढू लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT