mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024: विधानसभेसाठी महायुतीचं मेगाप्लॅनिंग! २० ऑगस्टपासून प्रचाराचा धुरळा, राज्यभर सभा, मेळाव्यांचा धडाका; बैठकीत काय- काय ठरलं?

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ९ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महायुती तसेच महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील मुख्य नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विधानसभेचा प्रचार, खास रणनितीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभेसाठी महायुतीचा मोठा प्लॅन!

अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विधानसभेसाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून काल वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असून प्रचाराची खास रणनिती ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सभा, रॅली अन् मेळाव्यांमधून महायुती महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

कसा असेल महायुतीचा प्रचार?

२० ऑगस्टपासून महायुतीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. विधानसभेसाठी महायुती राज्यभरात समन्वय मेळावे घेणार आहे. याशिवाय एक संवाद दौरा, लाभार्थी दौरा आणि प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एकत्रित सात सभा राज्यभरात होणार आहेत. तर आठवी आणि शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे.

मुंबईमधील आमदारांची धाकधुक वाढली!

दरम्यान, विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योजना आखली असून मुंबईमधील अनेक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील भाजपच्या अनेक तिकीट कापणार आमदार असल्याने नेत्यांमध्ये भिती पाहायला मिळत आहे.काही आमदार यांना वय आणि आजारपणाचे कारण देऊन त्याचे तिकीट कापले जाऊ शकते तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्याना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT