Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : महायुतीत ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटला? संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर

Mahayuti Seat Sharing : रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी नारायण राणेंच्या नावाची चर्चा होत आहे.

Ruchika Jadhav

सुरज सावंत

Lok Sabha Seat Allocation :

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र जागावाटपाबाबत अद्याप महायुतीचा फायनल फॉर्म्युला ठरलेला नाही. अशात ठाणे, रत्नागिरी आणि पालघरचा तिढा सुटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ठाण्याची जागा शिवसेना लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) राजन विचारे यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे गट) रवी फाटक याचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी राणेंच्या नावाची चर्चा होत आहे. तर पालघरच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे. शिवसेनेचे खासदर गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीये.

महायुतीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) आहे. युतीमध्ये जागावाटपावरून एकमत नसल्याचं अनेक नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत तिन्ही पक्षांच्या बऱ्याच बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्यापही कुणाच्या वाट्याला किती जागा हे निश्चित होऊ शकलेले नाही.

चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.

त्यानंतर आज अजित पवारांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी १ वाजता पुण्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT