Maharashtra Politics saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शपथ विधीची तारीख, खातेवाटप, मंत्रिपदाच्या नाराजीवर महायुतीचे नेते कोण काय म्हणाले?

Maharashtra Politics: महायुतीच्या सरकार स्थापनेचं कोडं अजून सुटलेलं नाहीये. मुख्यमंत्री, मंत्रिपदामुळे नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान महायुतीत सर्व काही ठीक असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे.

Bharat Jadhav

सुरज मसूरकर,प्रमोद जगताप

मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावरून महायुतीत गोंधळ वाढलाय. महायुत अडलेलं कोड आज सुटणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु महायुतीची आज कोणतीच बैठक झाली नसल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिलीय. तर भाजप महाराष्ट्रात धक्का तंत्र अवलंबणार असल्याचे सुतोवाच संजय शिरसाट यांनी केलेत. या वेगवेगळ्या विधानांमुळे सरकार स्थापनेतील खरा पेच काय हे अनेकांना कळत नाहीये. दरम्यान महायुतीच्या शपथ विधी, खातेवाटप, मंत्रिपदाच्या नाराजीवर महायुतीतील नेते काय म्हणाले ते पाहुयात.

शिंदे गटाचे नेते आणि आमदार दिपक केसरकर यांनी ५ तारखेला शपथविधी होईल. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. तर प्रकिया लेट होतेय त्यात त्यांची काही भुमिका असल्याचं दिपक केसरकर म्हणाले. सरकार स्थापनेला विलंब लागत असल्याने विरोधकांकडून महायुतीवर टीका केली जात आहे. त्यावर बोलतांना केसरकर म्हणाले, युतीची महायुती झाली आहे.

विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधक आता वेगवेगळी कारण शोधत आहेत. शपथविधीची तारीख ठरली आहे तर काही गोष्टी विनाकारण बाहेर येत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे नाराज?

एका बाजुला मुख्यमंत्रिपदाची शपथ विधी कधी होणार याची तारीख जाहीर करण्यात आलीय. पण मुख्यमंत्री कोण होणार हे अजून समोर आले नाहीये. तर शिंदे गटाला गृहमंत्रिपद हवे आहे.तर उपमुख्यमंत्री बाबत चर्चा सुरू असल्याचं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, तीन पक्षाचं सरकार असत तेव्हा चर्चा होत असते. पण त्यामुळे नाराज आहेत वैगरे अस बोलणे चुकीचे.आमची एकच मागणी की एकनाथ शिंदेच्या नेत्रुत्वाखाली निवडणूक लढवली त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे, असेही केसरकर म्हणाले.

मंत्रिपदबाबत काय म्हणाले तटकरे?

पाच डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी होईल. आमच्या वाट्याला किती मंत्रिपद येतील याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची विधिमंडळ नेते पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं ते ५ तारखेला शपथ घेतील, असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले.

खात्यांबाबत चर्चा नाही - तटकरे

कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती असतील यावर अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. महायुतीची बैठक पुन्हा दिल्लीत होईल याबाबत मला कुठीलीही वास्तविकता माहीत नाही. भाजपची विधिमंडळ दलाची बैठक परवा होईल त्यानंतर हव तर काही चर्चा होईल. अमित शाह यांच्यासोबत अजित पवार यांना स्वतंत्र बैठक होण्याची गरज मला वाटत नसल्याचं तटकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT