Ajit Pawar faction’s MPs skip Delhi all-party meeting, sparking fresh tensions within the Mahayuti alliance. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'महायुती'तला बेबनाव दिल्लीपर्यंत; भाजप बाटलेली, अजितदादांच्या मंत्र्याचा हल्लाबोल

Maharashtra Politics: महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. मित्रपक्ष भाजपवर नाराज आहेत. शिंदे सेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार नाराज असल्याचे समोर आलंय. अजितदादांच्या खासदारांनी दिल्लीतील बैठकीला दांडी का मारली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • महायुतीतील तणाव चर्चेचा विषय ठरलाय.

  • सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांनी दांडी मारली.

  • राष्ट्रवादीसोबतच शिंदेसेनाही मित्रपक्षांवर नाराज

महायुतीतील हेवेदावे किती टोकाला गेलेत, याचा प्रत्यंतर दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीत आला. दिल्लीत हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांनी दांडी मारली. एरवी सर्वपक्षीय बैठकीला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हजर राहतात. मात्र, राष्ट्रवादीचा एकही खासदार यावेळी बैठकीला हजर न राहिल्यानं महायुतीतील तणाव चर्चेचा विषय ठरलाय.

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंनीही भाजपबद्दल वादग्रस्त विधान केलयं.भाजप पूर्णपणे बाटलीय आणि त्यांचं आयुष्य फोडाफोडीवर चाललंय, अशी टीका कोकाटेंनी केली. तर कोकाटेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत. रमी खेळून बोअर झाले म्हणून भाजपवर टीका करत असल्याचा टोला परिणय फुकेंनी लगावलाय.

दुसरीकड् राष्ट्रवादीसोबतच शिंदेसेनाही मित्रपक्षांवर नाराज असल्याची चर्चा आहे. कारण दिल्लीतील बैठकीला नेहमी हजेरी लावणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी नरेश म्हस्केंनी हजेरी लावली. नगरपालिकेच्या निवडणुकीत मित्रपक्षच एकमेंकासमोर उभे राहिल्यानं आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीतील वाद उफाळून आलाय.

अशातच दिल्लीतील बैठकीला दांडी मारून अजितदादांच्या खासदारांनी मित्रपक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. महायुतीतल्याच मित्रपक्षातील हे फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणात निवडणुकीनंतर तरी थांबणार की पुढेही हा वाद असाच सुरूच राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

ISRO ने इतिहास रचला! वजनदार सॅटेलाइट केला लाँच, मोबाइल नेटवर्कमध्ये बदल होणार

Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

SCROLL FOR NEXT