Ramdas Athawale Saam Digital
महाराष्ट्र

Ramdas Athawale: राज ठाकरेंची हवा गेली, महायुतीला त्यांची गरज नाही: रामदास आठवलेंचं विधान

Ramdas Athawale On Raj Thackeray: नाशिक दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाबाबत मोठं विधान केलंय. आठवलेंच्या विधानामुळे नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

महायुतील घटकपक्ष असलेल्या रिपाइं पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरेंसंदर्भात मोठं विधान केलंय.महायुतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणत आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. तसेच महायुतीत मनसेच्या समावेशाला त्यांचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात फायदा नाही. मी असताना त्यांची काय गरज, असं रामदास आठवले म्हणालेत. रामदास आठवलेंनी केलेल्या विधानामुळे मनसे आणि महायुतीतील दुरावा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करू, असं म्हटलं होतं. त्यावरून पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर आठवले पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

आठवले म्हणाले की, नाशिक दौऱ्यावर आलो विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर आलो. लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले. आरक्षण जाणार हे सांगणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिलंय. लाडकी बहिण महिलांनी मतदान केले. संविधान हे राजकारण पलीकडे आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही.

मुख्यमंत्रिपदाची त्यांच्यात महाविकास आघाडीत रेस होती. आमच्या तिन्ही नेत्यांनी सांगितले आम्ही रेसमध्ये नाही. नाशिकमध्ये सर्वात मोठी धम्म परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा, अशी मागणी आपण महायुतीच्या मित्रपक्षांकडे केलीय. आम्हाला दोन मंत्री पद मिळणार असल्याचं महायुतीच्या पक्षांकडून सांगण्यात आल्याचं आठवले म्हणाले. भूमीहिन लोकांना पाच एकर जमीन देण्याचा निर्णय घ्यावा ही मागणी केल्याचं रामदास आठवले म्हणालेत. नवीन सरकारकडून विकासाच्या मागण्या केल्याचही ते म्हणाले.

EVMवर काय म्हणाले आठवले?

विरोधकांनी रडीचा डाव खेळू नका त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकसभेला ईव्हीएम खराब आहेत असं आम्ही म्हणालो का? असा सवाल त्यांनी मविआवर टीका करताना केला. त्यांनी पराभव मान्य केले पाहिजे. ईव्हीएम मशीन हे तुम्हीच आणली पुन्हा पेपरवर निवडणुका घेणे निवडणूक आयोग ठरवेल. बॅलेट पेपरवर आम्हला जास्त मतदान मिळेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

World Cancer Day : पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाटतोय? घाबरू नका! डॉक्टरांचा सल्ला वाचा अन् टेन्शन फ्री व्हा

राजकारणात भूकंप! मध्यरात्री भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT