Pune News: हरियाणा मध्ये झालेल्या निवडणुकीत जो जो अंदाज दाखविण्यात आलं होत ते सर्व अंदाज फेल ठरलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोच पावती येथील जनतेने दिली आहे. तेथे देखील डबल इंजिनचे सरकार होतं आणि जनतेने त्यांना साथ दिली आहे. आत्ता राज्यात देखील हरियाणाची पुनरावृत्ती होणार असल्याचं विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
"एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने जे विकास प्रकल्प बंद केले होते ते आम्ही सुरू केले आणि राज्यात नवीन उद्योग देखील आणले. राज्यात कल्याणकारी योजना देखील राबविल्या. लाडकी बहीण पासून ते अनेक योजना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात आल्या याची पोच पावती येत्या निवडणुकीत जनता आम्हाला नक्कीच देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हरियाणाचे निकाल आपण जर पाहिले तर या निकालाने सर्वच सर्व्हे आणि एक्झिट पोल फेल ठरवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कार आणि त्यांच्या कामाची पोच पावती येथील जनतेने दिली आहे आणि पुन्हा सैनी हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला जायची संधी मिळाली याचा आनंद आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षाचे जेवढे राज्य आहे त्या राज्यांमध्ये विकास तसेच कल्याणकारी योजना याबाबत बैठकीत चर्चा झाली. जवळपास पाच तास ही बैठक झाली असून अशी बैठक वर्षातून दोनवेळा व्हायला पाहिजे असे सगळ्यांचे म्हणणं होत.
"जागावाटपामध्ये काहीही अडचण नाही, सगळं समन्वयाने होणार आहे. आत्ता महाविकास आघाडीमध्ये काय गोंधळ चाललं आहे हे त्यांना विचारा. तसेच या निवडणुकीत महायुतीचं परफॉर्मस अतिशय चांगलं राहणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीच सरकार येणार आहे. जे लोक घरी बसले आहे त्यांना राज्यातील सरकार कायमचे घरी बसवणार आहे आणि काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देणार असल्याचे," यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.