Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal faces mounting pressure after ACB action in Mantralaya. Saam Tv
महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणात भूकंप होणार? मुंडे, कोकाटेंनंतर आणखी एक मंत्री राजीनामा देणार?

Ajit Pawar Ncp Third Minister Narhari Zirwal Bribery Row: महायुतीच्या सत्ता स्थापनेला वर्ष झालं.. मात्र आता वर्षभरातच दादांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या मंत्र्याची विकेट जाण्याची चर्चा रंगलीय.. त्यामागचं कारण काय? कोणत्या मंत्र्याच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे...

Bharat Mohalkar

धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची विकेट जाण्याची चर्चा रंगलीय... आणि त्याला कारण ठरलंय... मंत्रालयात लाचलुचपत विभागानं छापेमारी करुन नरहरी झिरवळांच्या कार्यालयातील क्लर्कला रंगेहात पकडल्याचं प्रकरण... या प्रकरणी आता नवा ट्विस्ट आलाय.. राजू ढेरिंगे मंत्रालयातच 50 हजार रुपयांची लाच मागतानाच व्हिडीओ समोर आलाय..

आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत वाढ झाली होती... एवढंच नाही तर तक्रारदार हरीराम घाणशींना सोबत घेत एसीबीनं चौकशीचा फास आवळायला सुरुवात केलीय.. एसीबीनं मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात तक्रारदारालाही सोबत घेऊन सखोल चौकशी केलीय.. एवढंच नाही तर मंत्रालयातील महत्वाची कागदपत्रं आणि वस्तूही ताब्यात घेतल्या आहेत... तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळांचे खासगी सचिव रामदास गाडेंना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलंय.. त्यामुळे या प्रकऱणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जाताहेत... याचाच तपास सुरु झालाय... याच चौकशीदरम्यान मंत्रालयातील लाचखोरीचं रेटकार्डही समोर आलंय... फाईलवर एक लाईन म्हणजे 50 हजार आणि 2 लाईन म्हणजे एक लाख रुपयांच्या लाचेचं रेटकार्डही साम टीव्हीच्या हाती लागलं... त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे....

याआधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड कनेक्शन समोर आल्यानं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता.. त्यानंतर नाशिकमध्ये बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून घरं लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानं माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलं.. तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार समोर आल्यानं झिरवळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जातेय..

त्यामुळेच महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी विकेट पडण्याची चर्चा आहे... मात्र मुंडे, कोकाटे यांच्यानंतर सुनेत्रा पवार आता झिरवळांना अभय देणार की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना निशस्त्र कऱण्यासाठी मुख्यमंत्री झिरवळांची विकेट घेणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT