Mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

Maharashtra Legislative Council Election: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी जागावाटपाचा महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला आहे. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार आहे.

Priya More
  • महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६

  • विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला

  • भाजप शिवसेना राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावर निर्णय घेण्यात आला

  • १२-३-२ या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा

वैदही कानेकर, मुंबई

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीची घोषणा केली. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी २ जागांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. येत्या आठवड्याभरात या जगांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यात आणखी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये विधानपरिषदेच्या १६ आणि एक पोट निवडणुकीची जागा असणार आहे. या निवडणुकीसंदर्भात काल समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. ही बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. या बैठकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते उपस्थित होते.

या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत फॉर्मुला बनवण्यात आला. यामध्ये १२ जागा भाजप, ३ जागा शिवसेना आणि २ जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. या चर्चेवर कुठलाही पद्धतीचा शिक्कामोर्तब झाला नसून आगामी होणाऱ्या समन्वय बैठकीमध्ये देखील याच फॉर्मुलावर सुरुवातीला चर्चा केली जाणार आहे. मात्र त्यात काही बदल होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावर प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली आहे. सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधानपरिषद जागेवर दावा करण्यात आला आहे. या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला १२, तर शिवसेनेच्या वाट्याला ३ आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला २ जागा असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत भाजप १२, शिवसेना ३, तर राष्ट्रवादी २ जागांवर चर्चा सुरु आहे. काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक चर्चेनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला -

भाजप १२

शिवसेना ३

राष्ट्रवादी २

कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा...?

राष्ट्रवादी काँग्रेस

- रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग, हिंगोली - परभणी

शिवसेना

- ठाणे, नाशिक, यवतमाळ,

भाजप -

- नागपूर, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर - जालना, सातारा - सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा - गोंदिया, अमरावती, लातूर - धाराशीव - बीड, सोलापूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; लग्नाच्या २ वर्षांनी घरी हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला VIDEO

Maharashtra News Live Update: पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात ब्लास्ट

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद, पाहा VIDEO

Weight loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा ओट्सचा 'हा' चटपटीत पदार्थ, वजन होईल कमी अन् दिसाल स्लिम- ट्रिम

PPF Interest Rate 2026: गुड न्यूज! PPF पासून ते सुकन्या समृद्धीपर्यंत..., सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT