Atul Save Warn To Shiv Sena MLA saam tv
महाराष्ट्र

Mahayuti: महायुतीत धुसफूस; युतीत राहायचं तर राहा, नाहीतर बाहेर पडा, भाजपचा शिंदे सेनेला इशारा

Atul Save Warn To Shiv Sena MLA: महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय. युतीत राहायचं असेल तर राहा नाहीतर बाहेर पडा, असा इशाराच भाजपनं शिंदे गटाला दिलाय. मात्र ही टोकाची प्रतिक्रीया का उमटली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Bharat Mohalkar

ऐकलंत, महायुतीत निधी वाटप आणि विकासकामांवरुन धुमशान रंगलंय. त्यातच आता भाजपनं थेट शिंदे सेनेच्या आमदाराला झापलंय. महायुतीत राहायचं असेल तर राहा अन्यथा बाहेर पडा, असा इशाराच ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी शिंदे गटाला दिलाय. तर बहुमत मिळाल्याने माज करु नये, असा पलटवार शिंदे गटाने केलाय.

महायुतीत शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्याला डावललं जात असल्याची तक्रार अमित शाहांकडे केल्याचंही म्हटलं जातंय.. त्यापार्श्वभुमीवर अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.

तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत महायुतीच्या आमदारांची फडणवीसांकडे तक्रार

महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या आमदारांना झुकतं माप दिल्याचा आरोप

तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे 2 तर शिंदे गटाचे 1 आमदार

आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती

हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकरांचेही पत्रातून सावेंना खडेबोल

सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही दिला इशारा

एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनीही उडी घेत सावेंच्या अधिकारांवरच बोट ठेवलंय.धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं जातंय. त्यातच फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा ही भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची? हा प्रश्न अनुत्तरीत आहे... मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT