Sanjay Shirsat’s meeting with Abhijit Dipke sparks political storm in Maharashtra; BJP expresses strong displeasure. saam tv
महाराष्ट्र

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

Mahayuti Row Sanjay Shirsat Dipke Meeting Controversy: आता बातमी दिपकेंवरून पेटलेल्या महायुतीतल्या वादाची...राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय. शिरसाटांवर नेमकं कोण नाराज झालंय? त्यांच्यासोबत आणखी कोणत्या तीन मंत्र्यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट,,,,,,

Suprim Maskar

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सुरु झालीय.... आणि त्याला कारण ठरलयं.... शिरसाटांनी CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंची त्याच्या घरी जाऊन घेतलेली भेट...दिपके- शिरसाट भेटीवरून राज्यातल्या नेत्यांनी उघ़डपणे कारवाईची मागणी केल्यानंतर आता दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठांनीही या भेटीची गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़. त्यात सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या आंदोलकाच्या घरी मंत्र्यानं जाणं अयोग्य असून, यामुळे महायुतीच्या भक्कमतेला बाधा पोहोचत असल्याचा संतापही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे...

संजय शिरसाट हे पहिल्यांदाच वादात सापडलेले नाहीत. यापूर्वीही ते विविध प्रकणांमुळे वादात सापडलेल आहेत.

कोणत्या प्रकरणांमुळे शिरसाट अडचणीत?

वीट्स हॉटेलच्या लिलाव खरेदीत मोठी अनियमिततेचा अंबादास दानवेंचा दावा

ट्रक टर्मिनसची जमीन मुलाच्या नावे केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्ग 2ची जमीन, शिरसाटांनी नियमबाह्य खरेदी केल्याचा दावा

जालना रोडवरील जमीन कवडीमोल भावानं घेतल्याचा आरोप

बेडखाली पैशांची बॅग असलेला व्हिडिओ समोर आल्यानं वाद

त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरसाटांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाकरेसेनेनं आयती संधी साधत शिंदेसेनेतील अंतर्गत नाराजीवर बोटं ठेवलयं...मात्र संजय शिरसाटांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर दुसरीकडे शिरसाटांच्या निमित्तानं इतर मंत्र्यांच्या कामगिरीवरही शिंदेंनी नाराजी व्यक्त केलीय. "जनतेची कामे करा, आपल्या मतदार संघात पक्ष वाढीवर लक्ष द्या...अन्यथा खांदेपालट अटळ आहे" अशा भाषेत एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांना दिलीय....

आता शिरसाटांसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नाराज शिंदे खांदेपालट करताना कुणाला डच्चू देणार आणि कुणाची खुर्ची वाचवणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT