Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युले? अजित पवारांनाही सीएमपदाची संधी मिळणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Political News : महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या नव्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Girish Nikam

मुंबई :

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं. सव्वादोनशे पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. मात्र सत्तास्थापनेबाबत नुसचं चर्चेचं गु-हाळ सुरु आहे. नेमकं घोडं कुठं अडलंय याची चर्चा आता सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदेंनी सीएमपदाच्या अडीच वर्षाच्या काळात प्रभावी कामगिरी केली आहे. स्वत:चा शिंदे ब्रॅण्ड तयार केला आहे. 57 आमदार शिंदे सेनेचे निवडून आले आहेत. महायुतीच्या विजयात शिंदेंचा मोठा वाटा आहे. सीएम बदलून वेगळा संदेश देऊ नका, असा युक्तीवाद शिंदेंचे आमदार करतायेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी बैठकांना जोर आलंय. पण निर्णय अजून होत नाही.मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

नेमका काय फॉर्म्युला असू शकतो पाहूयात

मुख्यमंत्रिपदाचे फॉर्म्युले?

महायुतीच्या मुख्यमंत्रिपदासाठी 2 फॉर्म्युले

पहिला फॉर्म्युला - अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद

पहिल्या फॉर्म्युलानुसार पहिली अडीच वर्ष फडणवीस मग पुढची अडीच वर्ष शिंदे मुख्यमंत्री

दुसरा फॉर्म्युला - 2-2-1 वर्षांसाठी मुख्यमंत्री

दुसऱ्या फॉर्म्युलानुसार फडणवीस 2 वर्ष त्यानंतर शिंदे 2 वर्ष आणि शेवटी 1 वर्ष अजित पवारांना मुख्यमंत्रिपद

अजित पवारांनी मात्र असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचं म्हटलंय. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या रस्सीखेचमुळे सत्तास्थापनेला विलंब होतोय एवढं मात्र नक्की.

मुख्यमंत्रिपदाच्या महत्वकांक्षेपोटी सत्तास्थापनेचं घोडं अडलंय. त्यामुळे भाजपचे दिल्लीतील चाणक्य यावर काय मार्ग काढतात याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे 2019 प्रमाणे भाजप पक्षश्रेष्ठी काही दुसरं धक्कातंत्र अवलंबणार का याचीही उत्सुकता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT