Mahavitran saam tv
महाराष्ट्र

Mahavitran: रिचार्ज करा अन् वीज वापरा, परभणीत महावितरण सव्वा दोन लाख ग्राहकांना देणार प्रीपेड स्मार्ट मीटर

यामुळे वीज चाेरी देखील थांबेल असा विश्वास महावितरणला आहे.

राजेश काटकर

Parbhani News :

वीज चोरी, वीज गळती व वाढणारी थकबाकी कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या (mahavitran) वतीने आता मोबाइलप्रमाणे वीज सेवासुद्धा प्रीपेड व पोस्टपेड करण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. (Maharashtra News)

प्रीपेड मीटरमध्ये पैसे संपले की वीजपुरवठा खंडित केला जाईल. रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल, अशी योजना महावितरण कंपनीची आहे. यामुळे वीज चाेरी देखील थांबेल असा विश्वास महावितरणला आहे.

जिल्ह्याला वीज पुरवठा करताना महावितरण कंपनीला सर्वसाधारणपणे महिन्याकाठी 180 मिलियन यूनिट (एमयूएस) लागते. जिल्ह्यातील 445 फीडरवरून वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, 145 फीडरवर मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने महावितरणच्या वीज समस्या सुविधांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यातच शहरात ग्राहक मीटरमध्ये वेगवेगळे गैरप्रकार करून वीज चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ग्रामीण भागामध्ये आकडा टाकून सर्रास वीज चोरी केली जाते. या सर्व प्रकारावर कारवाई करण्यासाठी महावितरणची यंत्रणा तोकडी पडत असल्याने जिल्ह्यात 50 टक्के अधिक वीज चोरी होते. त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने मोबाइलप्रमाणे वीज सेवासुद्धा प्रीपेड व पोस्टपेड करण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यात 2 लाख 16 हजार 114 घरी प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. परभणी जिल्ह्यात 1 लाख 21हजार 255 घरगुती, 7 हजार 376 वाणिज्य, 1 हजार 993 औद्योगिक यासह 96 हजार 793 कृषी पंपधारकांना जिल्ह्यात वीज पुरवठा केला जातो अशी माहिती महावितरणने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT