Mahavitaran News/file Photo
Mahavitaran News/file Photo SaamTV
महाराष्ट्र

Mahavitaran News : महावितरणची 'लाख'मोलाची कामगिरी; शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी लाखांहून अधिक नवे कनेक्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mahavitaran News: शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा 'पेड पेंडिंग'चा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने केलेल्या गतिमान कारवाईला यश येत आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन कनेक्शन देण्याच्या बाबतीत महावितरणने एक लाखाचा टप्पा नुकताच ओलांडला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

विजय सिंघल यांनी सांगितले की, महावितरणने (Mahavitaran) १ एप्रिल २०२२ नंतर ३० जानेवारी २०२३ अखेर चालू आर्थिक वर्षात दहा महिन्यांत दिलेल्या पेड पेंडिंग जोडण्यांची संख्या १, ०४, ७०९ इतकी झाली. त्यापैकी सुमारे ५४,००० नवे कनेक्शन महावितरणने केवळ गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दिले आहेत.

शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. ऊर्जा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना महावितरणला दिली होती. महावितरणने गेल्या सहा महिन्यांत विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सुमारे पन्नास हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिली होती. त्यापेक्षा जास्त वीज जोडणी नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या तीन महिन्यांत देण्यात आली.

महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार कामाला गती आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्च २०२३ पर्यंत आगामी दोन महिन्यांत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत, अशीही माहिती सिंघल यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Voting | जेनेलिया आणि रितेश देशमुख मतदानासाठी दाखल

Live Breaking News : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

Dhule Crime : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात एलसीबीची माेठी कारवाई, 55 लाखांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात

Bajaj Pulsur NS400Z: पॉवरफुल आणि सर्वात वेगवान Pulsur NS400Z लाँच; जाणून घ्या किंमत

Pune News: EVM मशिनवर 'कमळ' दिसेना.. पुणेकर आजोबा गोंधळले; भयंकर संतापले| VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT