Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाविकास आघाडी बरखास्त होणार; 'या' भाजप नेत्याने केला दावा

पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल असाही दावा केला आहे.

विजय पाटील

सांगली: मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे, आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल तसेच पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल असा दावा भाजप (BJP) नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.

केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगली भाजपाच्या वतीने जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांनी दिली आहे. आता राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल, त्यानंतर पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकच सरकार बरखास्त केले आहे. मात्र आता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मधील सरकार शंभर टक्के बरखास्त करतील, असेही हाळवणकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT