Ambadas Danve Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve News : महाविकास आघाडीची सभा न भूतो न भविष्यति अशीच होणार; अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास

MVA News: ते शहरात येऊन गल्ली बोळात फिरतील असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लावलाय.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar: 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेच्या तयारीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.आज ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते याच मैदानावर स्तंभ पूजन करण्यात आलं. (Latest Marathi News)

दरम्यान, या सभेला मैदानही कमी पडेल असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केलाय. विरोधक 5 तारखेला धनुष्यबाण घेऊन अयोध्येला जाणार असले तरी ते किती दिवस धनुष्यबाण अयोध्येला घेऊन जातील, असा टोला त्यांनी लावला.

एकनाथ शिंदे हे 9 तारखेला छत्रपती संभाजीनगरला येणार असले तरी ते या मैदानावर येणार नाही, इथे येण्यासाठी त्यांच्यात दम नाही. ते शहरात येऊन गल्ली बोळात फिरतील असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लावलाय. महाविकास आघाडीची सभा न भूतो ना भविष्यति अशीच होणार, असं देखील अंबादास दानवेंनी ठामपणे सांगितलं आहे.

तसेच पुढे विरोधकांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील अंबादास दानवेंनी प्रतिकिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, " विरोधक अगदी खालच्या पातळीवर बोलले आहेत. विरोधकांची पातळी अशीच आहे अशी टीका त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर केली.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

संजय शिरसाट यांनी दावा केला की, ठाकरे गटानेच नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी मला फोन केला. म्हणे ती बाई (सुषमा अंधारे) डोक्याच्या वर झाली आहे.

संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली. ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित,असं संयज शिरसाट यांनी म्हटलं. त्यावर आता अंबादास दानवेंनी पुन्हा एकदा संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

" माझा कोणाशीही काही संपर्क नाही. सध्या सर्वच गद्दार लोक अस्वस्थ झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते देखील संपर्कात असतात, मात्र आम्ही असा कोणताही दावा करत नाही. असं दानवेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT