Mahavikas Aghadi  Saam tv
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Legislative Council Election: महायुतीला चीतपट करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलीय. आज झालेल्या बैठकीत विधान परिषदेसह विधानसभा निवडणुकीसाठीही काय योजना असल्या पाहिजे याची चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी, यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखलीय.

विधान परिषदसोबत विधानसभा निवडणुकीसाठी  लवकरच जागावाटप संदर्भात चर्चा सुरू केल्या जातील. जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत झाली.लवकरच मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. एकप्रकारे भव्य सभा असेल ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे यश महाविकास आघाडीला प्राप्त झालं. त्यासंदर्भात मतदारांचा धन्यवाद दिले जातील, आभार मानले जातील आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल.

आगामी निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं. महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात  विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील. या सगळ्या संदर्भात  प्राथमिक चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष  यांची जिल्हा जिल्हास्तरावर एकजूट  निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे.

महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास आपण लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीत सुद्धा चांगलं यश मिळू शकतो हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. जागावाटपसंदर्भातील बैठकांना सुद्धा लवकरच सुरुवात केली जाणार असून जागा वाटपाच्या सूत्रसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

SCROLL FOR NEXT