सांगली: कवठेमहांकाळमध्ये आर .आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करत आहे. त्याच्या विरोधात सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. रोहित पाटील (Rohit Patil NCP) हे अवघ्या 23 वर्षाचे आहेत, त्यांना हारवण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगत आली आहे. (Mahavikas Aghadi against Rohit Patil; Kavathemahankal Nagar Panchayat election battle ...)
हे देखील पहा -
काल कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) मध्ये राष्ट्रवादी प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी ज्येष्ठ नेते म्हणाले 25 वर्षाच्या तरुण विरोधात सगळे आले आहेत. यावर रोहितने उत्तर दिले की, माझं वय 23 आहे पण 25 वय होईपर्यंत विरोधकांकडे काही ठेवत नाही. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीत (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते रोहित आर.आर. पाटील विरोधात महाविकास आघाडी तर एकीकडे कवठेमहांकाळ शहराकडे पाहिलं तर कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेला आहे.
तर शहरांमध्ये खासदार संजय काका पाटील भाजपा आणि घोरपडे शिवसेना, सगरे गट राष्ट्रवादी आणि गजानन कोठावळे गट अशी मिळून सर्वजण एकत्र येऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) निर्माण केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेऊन रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. तर कवठेमहांकाळ नगरपंचायतसाठी 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. येत्या 23 तारखेला मतदान पार पडणार आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.