Political Tensions Rise in Amravati After Alleged Assault on Municipal Assistant Commissioner saam tv
महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाकडून महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण

Amravati Political News : अमरावती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना ठाकरे सेनेचे नगरसेवकांनी मारहाण केल्याच्या घटनेने शहरात राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

Saam Tv

अमरावती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना ठाकरे सेनेच्या नगरसेवकाने मारहाण केली. या घटनेने शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.नगरसेवक संजय गव्हाळे यांनी सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याच्या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीचे समर्थन करताना गव्हाळे यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कथित अरेरावी आणि मग्रुरीच्या वर्तनावर गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत बोलताना संजय गव्हाळे म्हणाले की, माझे काही सहकारी सहाय्यक आयुक्तांकडे एका कामासंदर्भात पत्र घेऊन गेले होते. मात्र, चर्चेदरम्यान गव्हाळेंचा सहकारी पत्र घेऊन साहाय्यक आयुक्तांकडे गेले. त्यावेळी सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्याशी आरेरावीच्या भाषेत संवाद साधल्याचा आरोप त्यांनी केला.या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले होतो. मात्र, त्यावेळी आपल्याशीही सहाय्यक आयुक्तांनी आरेरावीच्या भाषेत बोलल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.मात्र हे, गव्हाळेंच्या सहकाऱ्याला खटकलं आणि त्यांच्यात वाद झाला.

संबंधित सहाय्यक आयुक्तांविरोधात यापूर्वीही अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या वागणुकीबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला. आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यांच्या बोलण्यात अधिकाऱ्याला शोभेल अशी भाषा नव्हती. उलट त्यांच्या बोलण्यात एटीट्यूड आणि मग्रुरी जाणवत होती, असे गव्हाळे म्हणाले.

अधिकारी म्हणून नागरिकांशी आणि लोकप्रतिनिधींशी सन्मानाने वागणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून अरेरावी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आपण त्यांना शिवसेना स्टाईलने सबक शिकविल्याचे विधानही संजय गव्हाळे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील सैनिकी शाळांचं ऑडिट होणार! फडणवीसांचा मोठा निर्णय; अनेक शाळांवर कारवाईची टांगती तलवार

Maharashtra News Live Update: बीकेसी मधील मेटा कार्यालयासमोर आंदोलन

Round vs Long Red Chilli: लांब लाल मिरची की गोल लाल मिरची? कोणती असते जास्त तिखट, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फरक!

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात भाजपचा दारुण पराभव! काँग्रेसचा 21 जागांवर दणदणीत विजय; वारं फिरलं?

मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

SCROLL FOR NEXT