SSC and HSC Board, Pune 
महाराष्ट्र

SSC HSC Result: दहावी-बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख आली समोर

Maharashtra SSC HSC Result: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दोन्ही बोर्डाच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षेत असते. आता दोन्ही परीक्षांचा लवकरच जाहीर होणार असल्याची बातमी हाती आलीय. या परीक्षांचा निकाल कधी लागणार याची संभाव्य तारीखदेखील समोर आलीय. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेत राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यात आले. आता परीक्षांचे निकालदेखील लवकर जाहीर करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलीय. पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.

'राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. झालेल्या विषयांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्यावर भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे', अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होतेय. मात्र यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्याची तारीख देखील आली आहे.

परीक्षेसाठी शिक्षणमंडळाचे कडक नियम

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला होता. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी बसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT