Maharashtra Politics: Saam tv
महाराष्ट्र

दिवाळीत लाभार्थ्यांना झटका; महायुती सरकारची 'ही' लोकप्रिय योजना होणार बंद?

Maharashtras Anandacha Shidha Scheme: राज्यात आर्थिक चणचण, आनंदाचा शिधा योजना होणार बंद? कारण काय?

Bhagyashree Kamble

  • महायुती सरकारची आनंदाचा शिधा योजना होणार बंद?

  • लाभार्थ्यांना १०० रूपयांत किट मिळत असे.

  • आर्थिक चणचणमुळे यंदा किट नाही?

सर्वसामान्यांसाठी आतापर्यंत महायुती सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या. यातीलच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली. काही योजना हिट ठरल्या. तर, काही फेल ठरल्या. आता महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही लोकप्रिय बंद पडण्याच्या मार्गावर असताना महायुती सरकारची 'आनंदाचा शिधा' ही योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

'आनंदाचा शिधा' या योजनेला सुरूवातीला भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत दिवाळी तसेच इतर सणाला रेशनच्या दुकानात सामान्यांना किट मिळायचे. या किटद्वारे १ किलो चणा डाळ, साखर आणि १ लिटर खाद्यतेल, अशा ४-५ गोष्टी मिळतायेत. या गोष्टी अवघ्या १०० रूपयांत लाभार्थी व्यक्तींना मिळत असे. २०२४ साली महत्वाच्या सणाला सरकारतर्फे किटचं वितरण करण्यात आलं.

मात्र, यंदा गणेशोत्सव तसेच दिवाळीत राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वितरीत केला गेला नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार की काय? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. दिवाळीत आनंदाचा शिधाचे किट मिळेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, अद्याप तरी सरकारकडून आनंदाचा शिधाबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

आनंदाचा शिधा नेमकी योजना आहे तरी काय?

दसरा - दिवाळी या उत्सवांच्या काळात रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जातो. पांढरे रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधाचे लाभ मिळत नाही. इतरांना १ किलो पाम तेल, चणा डाळ, रवा आणि साखर मिळते. फक्त १०० रूपयांत हे किट मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या ७२ लाख शिधापत्रकारांनी या योजनेचा लाभ घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhainagar : सिल्लोडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; मका, कापूस, बाजरीचं नुकसान | VIDEO

Maharashtra Live News Update : देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिध्यावर गदा आणली- रोहित पवार

'Bigg Boss 19'चे घर बनले युद्धाचे मैदान, ६ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यावर ₹३००० दिवाळीत? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Crime : खून का बदला खून से...! १४ वर्षानंतर बापाच्या हत्येचा घेतला बदला, धक्कादायक घटनेने गावात खळबळ

SCROLL FOR NEXT