Election Commission officials discussing revised Maharashtra local body poll schedule after Supreme Court order. Saam Tv
महाराष्ट्र

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Maharashtra Civic Poll Chaos: नगरपालिका निवडणुकीतील गोंधळामुळे निवडणूक आयोगावर सर्वच स्तरातून हल्लाबोल होतोय.आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबाबत आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत... मात्र यातील कोणती निवडणूक आधी होणार ? जिल्हा परिषदेचा धुरळा किती टप्प्यात उडणार आहे?

Bharat Mohalkar

न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचं नियोजन कोलमडलंय.. त्यामुळे निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी महापालिका निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. आता14 डिसेंबरला अधिवेशनसंपल्यानंतर महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे... तर त्यासाठी 4 डिसेंबरला आयोगाने राज्यातील 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावलीय....मात्र निवडणूक किती टप्प्यात घ्यायची याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काय शक्यता आहेत..

सुप्रीम कोर्टाचे 50 % मर्यादेतच निवडणूका घेण्याचे आदेश

17 जिल्हा परिषदेत आरक्षण मर्यादा ओलांडली

आरक्षण मर्यादेवर 21 जानेवारीला सुनावणी

त्यामुळे जिल्हा परिषदेआधी पालिका निवडणुका होण्याची शक्यता

महापालिका निवडणुका 14 डिसेंबरच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता

महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणूक 2 टप्प्यात होण्याची शक्यता

पहिल्या टप्प्यात 15 तर दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याची शक्यता

दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी 2 टप्प्यात निवडणुका घ्यायच्या असतील तर त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी केलीय... 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर आयोगाचा सावळागोंधळ समोर आला... त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच नव्हे तर महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडणार की सगळी निवडणूक प्रक्रियाच कोर्टाच्या कचाट्यात अडकून घटनात्मक पेच निर्माण होणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT