zp election in maharashtra 2025 date Saam TV marathi news
महाराष्ट्र

ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? महत्त्वाची माहिती समोर आली

zp election in maharashtra 2025 date : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही, असे कोर्टाकडून स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti elections Date : राज्यातील स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका  (Maharashtra local body elections)ठरलेल्या वेळेतच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली (Supreme Court on Zilla Parishad Elections) जाणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. काही दिवसांत जिल्हा परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे समजतेय. (Supreme Court on 50% reservation breach in Maharashtra local body elections)

राज्यात तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदेचं बिगुल वाजलेय. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेचा धुरळा उडणार आहे. सोमवारी आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली, त्या ठिकाणी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.

राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद -

नंदुरबार 100%

पालघर 93%

गडचिरोली 78%

नाशिक 71%

धुळे 73%

अमरावती 66%

चंद्रपूर 63%

यवतमाळ 59%

अकोला 58%

नागपूर 57%

ठाणे 57%

गोंदिया 57%

वाशिम 56%,

नांदेड 56%

हिंगोली 54%

वर्धा 54%

जळगाव 54%

भंडारा 52%

लातूर 52%

बुलढाणा 52%

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक राज आहे. गेल्या ८ वर्षांपासून नगरपरिषदा, नगरपंचायती, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडालाय. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधीच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी आयोगकाडून निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

५७ ठिकाणी टांगती तलवार -

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका वेळेतच होतील, त्याला कोणताही स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीवेळी स्पष्ट केले. २ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्याला स्थगिती देणे आता योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटलेय. पण ज्या ५७ ठिकाणी आरक्षणाचे उल्लंघन झालेय, त्या ठिकाणे अंतिम निर्णयासाठी बांधील असतील, असेही स्पष्ट केलेय. २१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे, त्यावेळी या ५७ ठिकाणाचा निकाल निश्चित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT