IMD Maharashtra weather forecast : राज्यातून पावसाचे वातावरण ओसरले असले तरी, आता नागरिकांना पुन्हा एकदा कडक ऊन आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांत दिवसाच्या कमाल तापमानात ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. ऐन थंडीच्या दिवसांच्या तोंडावर उन्हाचा हा चटका वाढल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पहाटे हवामानात गारवा जाणवत आहे, पण दिवसा मात्र ऊन प्रचंड वाढल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. (Maharashtra winter weather update)
तापमानात वाढ आणि उकाडा कायम
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून पाऊस दूर झाल्यानंतर आकाश निरभ्र होत चालले आहे, ज्यामुळे सूर्यप्रखरता थेट जाणवत आहे. राज्याच्या अनेक भागांत दुपारचे तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल २ ते ३ अंशांनी अधिक रेकॉर्ड केले जात आहे. यामुळे दिवसभर प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत.
कुठे किती आहे उष्णता?
राज्यात विविध ठिकाणी तापमानाचा पारा वाढलेला आहे. काही भागांत उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. किनारपट्टी भागात दमट हवामानामुळे उकाड्यात आणखी भर पडली आहे. मुंबईतील कोलाबा परिसरात राज्यातील उच्चांकी ३६.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
पहाटे गारवा
राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी हलकासा गारठा सुद्धा अनुभवायला मिळत आहे, ज्यामुळे दिवसाची कडक ऊन आणि रात्रीचा हलका गारठा असा संमिश्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पुढील काही दिवस हवामान असेच कोरडे राहण्याची आणि उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.