Maharashtra Weather Forecast Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : हिवाळ्यात घाम फुटला, थंडी कधीपासून येणार, हवामानाचा अंदाज काय सांगतो?

Maharashtra Weather News Update : राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आले.

Namdeo Kumbhar

Maharashtra Winter Weather News Update : राज्याभर सध्या ऐन हिवाळ्यातून थंडी गायब झाली आहे. ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम निघत आहे. तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी झोडपून काढत आहेत. मुंबईसह कोकणात उन्हाचा ताप अधिक वाढलाय. शुक्रवारी ठाणे येथे देशातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून थंडीला सुरुवात होणार आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहू शकते. सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीला सुरूवात होऊ शकते. सध्या काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

राज्यात थंडी कधीपासून? हवामानाचा अंदाज काय सांगतो ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर सोमवारपासून ढगाळ वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. मुंबई आणि कोकणकरांना थंडीसाठी प्रतिक्षा पाहावी लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पहाटे ५ वाजेचे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ अंशांपर्यंतही घसरण्याची शक्यता आहे.

अवकाळीमुळे जालन्यात पिकाचे मोठ नुकसान

शुक्रवारी दिवसभर जालना जिल्हयामध्ये सर्वदूर अवकाळी रिमझिम पाऊस बरसला . या पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जालन्यातील जाफराबाद तालुक्यात देखील काल आवकली पाऊस बरसला.यापावसामुळं शाळू ज्वारीचे पीक आडवे झाल्याने धान्य पिकाचे मोठे नुकसान झाले असून हरबऱ्याला देखील बुरशीजन्य रोगाचा धोका होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT