राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरमध्ये सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत सत्ताधारी बाकावर बसले. ज्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. त्याआधी शिवसेना- शिंदे गट ठाकरे गटाचे आमदार आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. राज्याच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन विधान भवनासमोर जुगलबंदी रंगली.. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर.
राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या एका वर्षांपासून रखडला आहे. शिंदे गटातील नेत्यांनाही मंत्रीपदाची आस आहे. मात्र त्यांची ही इच्छा अद्याप पुर्ण झालेली नाही. यामध्ये आघाडीवर असलेले नाव म्हणजे आमदार भरत गोगावले. याच मुद्द्यावरुन विधान भवन परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, आणि शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाटांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
यावेळी ठाकरे गटाचे वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी "आत्तापर्यंत पाच- सहा अधिवेशने झाली. यापुढे अधिवेशन होण्याची शक्यता नाही. तुम्ही कोटही उत्तम घायलायं. मग मंत्रीपद कधी मिळणार? " असा सवाल संजय शिरसाटांना (Sanjay Shirsat) विचारला. यावर शिरसाटांनी" वैभव माझा मित्र आहे. मला मंत्रीपद मिळाले नाही, मात्र तु चांगली भावना व्यक्त केली. असा संस्कृती जपणारा मित्र पाहिजे.." असा टोला नाईकांना लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी आमदार भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) एन्ट्री झाल्यानंतर वैभव नाईकांनी मंत्रीपदावरुन त्यांनाही चिमटा काढला. प्रत्येक अधिवेशनात भरत शेठ वेगवेगळ्या रंगाचे कोट घालून येत होते. आता त्यांनी कोट घालणेही बंद केले. मंत्रीपदाची आशा सोडली का? असे वैभव नाईक म्हणाले. यावर भरत गोगावलेंनीही नाईकांवर पलटवार केला.
"वैभव, अधिवेशन संपता संपता सांगतो तुला. वैभवची इच्छा असेल तर त्याला माझा कोट चढवतो. एका गोष्टीसाठी मी थांबलोय. वैभव आमच्याकडे येत असेल तर त्याच्या साठीही थांबेन." अशी खुली ऑफरच त्यांनी नाईकांना दिली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.