Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Weather Updates : उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे, पण मराठवाडा आणि कोकणात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather update News in Marathi : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे थंडीची प्रतीक्षा (Maharashtra Winter Weather) कायम आहे. अवकाळी पावसाचामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. मात्र हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थंडीची प्रतीक्षा, शेतकऱ्यांना मोठा फटका -

यंदा पावसाळा सहा महिन्यांचा झालाय. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार आहे. त्यामुळे आंबा, काजू आणि इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबर अखेर थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

Tomato Storage Tips: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? ताजा आणि चांगला ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ सोपे उपाय

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT