Maharashtra Weather Report Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Alert: राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. कधी उन्हाचा तडाखा, तर कधी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. बदलत्या वातारवरणामुळे काही भागात उष्णतेची लाट सुद्धा आली आहे. अशातच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

येत्या ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने  (Rain Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.

विशेष बाब म्हणजे, रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा आणि विजांच्या कडकडाटासह विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासुन काहीसा दिलासा मिळाला आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.

राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय  (Weather Updates) स्थिती निर्माण झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

SCROLL FOR NEXT