Maharashtra Rain Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: भर उन्हाळ्यात कोसळणार मुसळधार पाऊस, राज्यात या भागांना 'यलो अलर्ट'

Maharashtra Rain Update : पुन्हा हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra News : राज्यावर सध्या पावसाचे (Rainfall) सावट आहे. ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये आता पुन्हा हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये राहणारे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तर, ७ एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल म्हणजे आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. त्याचसोबत नागरिकांनी देखील अवकाळी पावसावेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. या पावसादरम्यान नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये. त्यासोबत विजेच्या तारा आणि खांबांजवळ जाऊ नये, असे देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT