छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Surabhi Jayashree Jagdish

लढाईत मृत्यू पावलेले सैनिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध केवळ जिंकण्यासाठी नाही तर धर्म, स्वराज्य आणि माणुसकी जपण्यासाठी लढलं जायचं. त्यामुळे लढाईत मृत्यू पावलेल्या किंवा जायबंदी झालेल्या सैनिकांबाबत त्या काळात विशेष व्यवस्था होती.

सैनिक कल्याण

महाराजांच्या आधी अनेक सत्तांमध्ये सैनिक हे फक्त साधन मानले जात, पण शिवाजी महाराजांनी सैनिक कल्याणाची स्वतंत्र नीती राबवली होती. महाराजांच्या नंतरही त्यांच्या आदर्शांवर काही काळ ही परंपरा टिकून राहिली.

मृत सैनिकांचे अंत्यसंस्कार

लढाईत मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया ही लढाईच्या निकालावर आणि त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असायची. जी बाजू लढाई जिंकेल, ती आपल्या मृत सैनिकांचे मृतदेह एकत्र करून त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करत असे.

हिंदू सैनिक

हिंदू सैनिकांवर अग्निसंस्कार (दहन) केलं जात तर मुस्लिम सैनिकांना दफन केले जात असे. अनेकदा लढाईच्या मैदानावरच सामूहिक अंत्यसंस्कार केले जात, कारण प्रत्येक सैनिकाचा मृतदेह त्याच्या गावी पाठवणं शक्य नसायचं.

दगडी शिळा

लढाईत वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ दगडी शिळा उभ्या केल्या जात, ज्यांना 'वीरगळ' म्हटलं जातं होतं. यावर त्या योद्ध्याच्या पराक्रमाची माहिती कोरलेली असे.

पराभूत बाजूची स्थिती

पराभूत झालेल्या सैनिकांच्या मृतदेहांची बऱ्याचदा अवहेलना होत असे. ते लढाईच्या मैदानावरच पडून राहत असत. काही वेळा, माणुसकीच्या नात्याने किंवा वाटाघाटी करून, विजयी राजा पराभूत सैन्याला त्यांच्या सैनिकांचे मृतदेह घेऊन जाण्याची परवानगी देत असे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण

अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून यायचं. त्यांनी शत्रूच्या सैनिकांच्या मृतदेहांचीही योग्य ती विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. स्त्रिया किंवा धार्मिक स्थळांना कोणताही धक्का न लावण्याचे त्यांचे सक्त आदेश होते, त्याचप्रमाणे मृत सैनिकांचाही ते सन्मान करत.

जखम दरबार

युद्ध करून आल्यानंतर छत्रपती एक जखम दरबार भरवला जात असे. छत्रपती शिवाजी महाराज जखमी झालेल्या सैनिकांचा उपचार करून घेत असत. तसंच त्यांना योग्य तो सन्मान दिला जात होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा