Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्यामागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 26th December 2025: सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत. सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे ७७०० रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर वाढले

सोन्याचे दर सलग ४ दिवस वाढले

सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे ७७०० रुपयांची वाढ

सोन्याचे दर आठवड्याभरात सलग चार दिवस वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने सोनं खरेदी करताना १० वेळा विचार करावा लागतोय.

Gold Rate Today
Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या दिवसात अनेकजण सोनं खरेदी करतात. लग्नाच्या घरात नवरीसाठी दागिने बनवले जातात. परंतु आता हे दर वाढल्याने दागिने बनवण्यासाठीचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोगा नाहीये. अनेकजण सोन्याचे दर कमी होती, या आशेवर होते. मात्र, सोन्याचे दर काही कमी होतच नाहीयेत. सोन्याचे दर पुढील काळात अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

२४ कॅरेटचे दर (24k Gold Rate)

आज १ तोळा सोन्यामागे ७७० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर १,४०,०२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,१२,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,७०० रुपयांनी वाढले असून १४,००,२०० रुपये आहेत.

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,२८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५६० रुपयांनी वाढले असून १,०२,६८० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून हे दर १२,८३,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price: सोनं पुन्हा चमकलं, १० तोळे सोनं २४,००० रुपयांनी महागलं; १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर किती?

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

१८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ५८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,०२० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४६४ रुपयांनी वाढले आहे. हे दर ८४,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे हे दर ५,८०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,५०,२०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com