Maharashtra Weather Updates IMD Rain Alert Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मुंबईसह राज्यात आज कसा असेल पाऊस?, हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

Mumbai Rain Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप अशीच सुरुच राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Priya More

IMD Alert For Maharashtra: राज्यासह देशामध्ये सध्या पावसाने (Maharashtra Rain) विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department) ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवली होती. अशामध्ये पुणे हवामान खात्याने (Pune Meteorological Department) राज्यातील पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप अशीच सुरुच राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप अशीच सुरु राहिल. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभगाकडून पुढील चार दिवस राज्यात पावसाबाबत कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आलेला नाही.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि नागलँड ही राज्ये वगळता उर्वरित राज्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसंच येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

महत्वाचे म्हणजे, राज्यात पुढील 4 दिवस कुठल्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. त्याचसोबत मुंबईमध्ये पुढचे ४ ते ५ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही. मुंबईत येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणामध्ये १० ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT