Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Update: स्वेटर मफलर तयार ठेवा, राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुढील ४ दिवसांत कापरं भरणारी हुडहुडी

Maharashtra Weather Update: तामिळनाडूमध्ये सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Update Today

तामिळनाडूमध्ये सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढला आहे. परिणामी राज्यातील अनेक भागातील तापमानाचा पारा घसरला आहे. थंड वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. यवतमाळ येथे सर्वात कमी ८.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थंड वाऱ्यांमुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. गारठ्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात नागपूरचे तापमान प्रथमच १० अंशांच्या आत नोंदवले गेले आहे. सध्या नागपुराची महाबळेश्वरपेक्षाही थंड शहर म्हणून नोंद झाली.

कडाक्याच्या थंडीमुळे विदर्भातील ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरवासीयही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहत असल्यामुळे नागरिकांना स्वेटर तसेच जॅकेट घालून फिरावे लागत आहे. शिवाय थंडी घालविण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

हवामान विभागाने या आठवड्यातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून विदर्भातील नागरिकांची सुटका शक्य नाही. दुसरीकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.

महाराष्ट्रात २४ तासांमध्ये नोंदले गेलेले किमान तापमान

पुणे १२, धुळे ७.५, जळगाव ११.७, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १२.९, नाशिक १४.४, निफाड ११.२, सांगली १५.८, सातारा १५.१, सोलापूर १५.५, सांताक्रूझ २१.२, डहाणू १९.५, रत्नागिरी २४.४, छत्रपती संभाजीनगर ११.४, नांदेड १४, परभणी १२.७, अकोला ११.४, अमरावती १०.६, बुलडाणा ११, ११, चंद्रपूर ९.४, गडचिरोली ९.६, गोंदिया ९.२, नागपूर ९.८, वर्धा ११.४, वाशीम ९.८, यवतमाळ ८.७.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

SCROLL FOR NEXT