Unseasonal Rain Update
Unseasonal Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain Update: सातार- सांगली-कोल्हापूरला अवकाळीचा फटका, वीज पुरवठा खंडीत झाल्याने जनजीवन विस्कळीत

Priya More

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशामध्ये आजही अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली त्यामुळे रस्ते बंद पडले. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच, शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हातकणंगलेमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या महिनाभर उखाड्यांने हैराण झालेल्या जयसिंगपूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर पोहचला होता. या पावसामुळे जयसिंगपूर-सांगली मार्गावरील अनेक झाडं उन्मळून पडली. त्यामुळे जयसिंगपूर-सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तीन तासांपासून जयसिंगपूर-सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

सांगली -

सांगली जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मिरज पूर्व भागातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. अवकाळी पावसामुळे लिंगनूर, शिंदेवाडी, मल्लेवाडी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली त्यामुळे वाहतुकीची गैरसोय झाली. तसेच या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच काही गावात मोठा पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भाजी पाल्याच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. बेबीकॉर्न, मका पिक वादळी पावसामुळे जमीन दोस्त झाले आहे.

जालना -

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर वडीगोद्री येथे पत्र्याच्या घरावर भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील उशिरा पेरणी केलेल्या गहू,ज्वारी या पिकांसह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तर वडीगोद्री येथे वडीगोद्री-चौंडाळा रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे.

पुणे -

पुण्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. या पावासामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाघोलीमध्ये होर्डिंग पडले. वाहनांवर होर्डिंग पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे. होर्डिंग पडल्यामुळे विद्युत तारा तुटल्या आहेत. त्यामुळे परिसरात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

सातारा -

सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. कराड तालुक्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दोन दिवसांपासून साताऱ्यात उकाडा वाढला होता. या पावसामुळं नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला. या पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भंडा-यात लहान मुलांच्या जीवाशी खेळ? महिला व बाल विकास अधिका-यांनी घेतलं गांभीर्यानं, दिले चाैकशीचे आदेश

Garlic Benefits: सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे काय?

Gold Silver Rate Hike : सोन्यासह चांदीची चकाकी वाढली; वाचा मुंबई-पुण्यातील नव्या किंमती

Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!

Lonavala Accident : खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दाेघांचा मृत्यू, सहा जण जखमी

SCROLL FOR NEXT