Maharashtra Weather News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजचे हवामान कसे असेल? वाचा

Maharashtra Weather News : राज्यात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असून विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव

  • काही जिल्ह्यांत तापमान ४० अंश पार

  • विदर्भ, कोकणात येलो अलर्ट जारी

  • अकोला सर्वाधिक तापमान असलेले शहर

  • पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम

Maharashtra Today 28th March Weather News राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश पार गेला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज पूर्व विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.दरम्यान पुढील काही दिवस कोकणात पावसाळी वातावरण राहणार आहे.

रत्नागिरीतील चिपळूण,लांजा,राजापूरात आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान देखील झालेले पाहायला मिळत आहे. आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

एकीकडे पावसाने झोडपून काढले असून दुसरीकडे उन्हाच्या झळा तापदायक ठरत असल्याने दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे असह्य आहे. काल म्हणजेच शुक्रवारी अकोलासह अमरावती येथे ४१ अंशापेक्षा अधिक, तर परभणी, ‎ब्रह्मपुरी, ‎वर्धा आणि ‎यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. तसेच जळगाव, ‎सोलापूर, ‎चंद्रपूर आणि ‎वाशीम येथे ३९ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथे १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अकोल्यात तापमानाचा पारा ४०शी पार

अकोला शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी ४१.८ आणि शुक्रवारी ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली. काल देखील दिवसभर उन्हाच्या झळा जाणवल्या. शहरात मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात तापमानाचा पारा ४२ अंशांपर्यंत गेला होता. त्यानंतर आता मार्चच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा तापनामाचा पारा वाढला आहे. अकोला शहर विदर्भातील सर्वाधिक तापमान असणारे शहर ठरले आहे. तसेच आगामी काही दिवस अकोल्यात उष्णतेची लाट कायम राहणार, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या संभाजीनगर शहरात निदर्शने

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

महत्त्वाची बातमी! टोल प्लाझावर आजपासून नवे नियम लागू; रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य

Tips To Get Glowing Skin: महागड्या फेशियलला करा Bye! हळदीचा खास फेसपॅक देईल नैसर्गिक गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT