MAHARASHTRA RAIN UPDATE Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट राहिली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather alert today for four Marathwada districts : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा जोर काहीसा ओसरला आहे. पावसात तूट पाहायला मिळत आहे. पण काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. परंतु, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील इतर भाग आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामानाचा खेळ पाहायला मिळेल. अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी घाटमाथ्यावर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

वातावरणातील बदल काय आहेत?

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र ते गुजरात दरम्यान तयार झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे राज्यात ठिकठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात आज ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

३१ दिवस पावसाचा खंड, ११४ मिलिमीटर पावसाची तूट

मराठवाड्यासह सोलापूर, नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील सर्व ३१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. श्रावणसरींचा महिना असलेला ऑगस्ट यंदाच्या पावसाळ्यात कोरडा गेला असून, पिकांवर आता पावसाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या ३१ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके वाळून चालली आहेत. अहोरात्र मेहनत करून वाढवलेली पिके काळजाला चटका लावून चालली आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे शिवारातील ही दृश्य आहेत. सोयाबीन, मग उडीद, बाजरी, ज्वारी डोळ्यादेखत वाळून चालली आहे. पिकांना पावसाची गरज असतानाच पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी १७० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ५६.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये तब्बल ११४ मिलिमीटर पावसाची तूट राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT