‘ऑक्टोबर हीट’मुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता काहीसा दिलासा मिळू लागलाय. राज्यात हळूहळू थंडी वाढत असून सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागलाय. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. कमाल तापमानातही हळूहळू घट होत आहे. आज (१४ नोव्हेंबर) राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ आणि सोलापूरमध्येही तापमान ३५ अंशांच्या पुढे होते.
याशिवाय राज्यातील काही भागांमध्ये सकाळचा गारठा वाढू लागला आहे. पण नागरिकांना अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी गोंदियामध्ये राज्यातील सर्वात कमी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये गहू संशोधन केंद्रात १२.३ अंश, तर परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात १२.४ अंश तापमान नोंदवण्यात आलंय.
जळगाव, जेऊर, नाशिक, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणीही किमान तापमान १४ अंशांच्या खाली गेलंय. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. दक्षिण अंदमान समुद्राच्या परिसरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आग्नेय बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. आज त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. तसंच आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या जवळ ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणी नोंदवलेले कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे -
पुणे - कमाल ३२.६, किमान १४.३
अहिल्यानगर - कमाल ३३.६, किमान १६.३
जळगाव - कमाल ३३.४, किमान १४
जेऊर - कमाल ३३.५, किमान १३.५
कोल्हापूर - कमाल ३१.४, किमान १७.८
महाबळेश्वर - कमाल २६.१, किमान १५.६
नाशिक - कमाल ३२.९, किमान १३.९
निफाड - कमाल ३३.१, किमान १२.३
सांगली - कमाल ३२.९, किमान १७
सातारा - कमाल ३३.६, किमान १४.४
सोलापूर - कमाल ३५, किमान १७.३
सांताक्रूझ - कमाल ३५.३, किमान १८.९
डहाणू - कमाल ३४.९, किमान १९.४
रत्नागिरी - कमाल ३६.२, किमान १९.६
छत्रपती संभाजीनगर - कमाल ३३.९, किमान १६.६
धाराशिव - कमाल ३३.९, किमान १८.१
परभणी - कमाल ३२.७, किमान १६.८
परभणी (कृषी विद्यापीठ) - कमाल ३२.२, किमान १२.४
अकोला - कमाल ३३.३, किमान १७.६
अमरावती - कमाल ३३, किमान १५.९
ब्रह्मपुरी - कमाल ३१, किमान १६.६
बुलडाणा - कमाल ३१.८, किमान १८.८
चंद्रपूर - कमाल ३२.४, किमान १६.६
गडचिरोली - कमाल ३१.८, किमान १६.४
गोंदिया - कमाल २९.८, किमान १२
नागपूर - कमाल ३०.८, किमान १३.४
वर्धा - कमाल ३२.५, किमान १६.९
वाशीम - कमाल ३२.४, किमान १५.४
यवतमाळ - कमाल ३३.४, किमान १३
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.