Maharashtra Rain Alert Weather Updates Paus  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rain Update News: राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने राज्यातील मोजक्या काही ठिकाणी हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जोरदार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे काही भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, काही भागातील शेतकरी अद्याप चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर चांगला पाऊस न झाल्याने काही भागातील धरणे आणि नद्याच्या पाणीपातळी घट झाली आहे.

अकोला जिल्हातही 5 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट

अकोला जिल्ह्यात चार दिवसांच्या खंडानंतर काल पावसाने जोरदार हजेरी लावली. तर अकोला जिल्ह्यातील काही भागांसह अकोला शहरात काल सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे.

नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने अकोला जिल्ह्यात 5 ऑगस्टपर्यंत 'यलो अलर्ट' दिला. त्यामुळे पुन्हा पाऊस धो-धो बरसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील गावांना व पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणाचे ते 33 पैकी नऊ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे काल गोसेखुर्द धरणाचे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. यामधून 41 हजार 216 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT