Maharashtra Rain Alert 
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार असून पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Monsoon Update : मागील काही दिवसांत पावसानं घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्ह आहेत. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये. पुणे, साताऱ्यासह 5 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. पुढील 4 ते 5 दिवस केवळ तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहे. २१ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागनं व्यक्त केलाय.

पुढील तीन ते चार दिवस पुण्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार, भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी सातारा घाटमाथा, सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात मात्र उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

पुणे, सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यांना बुधवारसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांना हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन

सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; शासनाकडून मिळणार पाठबळ

Kul Jamin: कुळाचा मृत्यू झाल्यानंतर कुळ जमीन वारसांना मिळते का?

Cancer : रात्री झोपताना तुम्हीही करताय का ही गंभीर चूक? कॅन्सरपासून वाचायचं असेल तर आत्ताच बदला सवय

सरकार चार पावले पुढे येत असेल तर...; एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

SCROLL FOR NEXT