Pune : पुण्यातील जप्त केलेल्या ६ कोटींच्या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, गोल्फ कोर्सचा हमाल बनला 'बेनी'चा दलाल

Pune drug bust : पुण्यात जप्त करण्यात आलेल्या सुमारे ₹५.७९ कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा धागा समोर आला आहे. आरोपीने दिल्लीहून ड्रग्ज आणल्याची कबुली दिली आहे.
Pune ₹5.79 crore MD drug seizure
Pune ₹5.79 crore MD drug seizureSaam
Published On

Pune ₹5.79 crore MD drug seizure : पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा ड्रग्जचा साठा बंगळुरूत पोहोचविण्यासाठी निघालेला असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कात्रज येथे सापळा रचून त्याला पकडले.

प्रशांत सुरेश सावंत (३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन, एक मोबाईल आणि एक बॅग असा एकूण ५ कोटी ७९ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एम डी साठा जप्त केल्यावर हे प्रकरण एका मोठ्या नेटवर्क चे असल्याचा अंदाज येताच पोलिसांनी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची साखळी उलगडण्यासाठी आरोपीला दिल्ली येथे नेलं. तपासादरम्यान, आरोपी ने हे एम डी नायजेरिया च्या बेनी नामक महिलेने सांगितलेल्या पत्त्यावरून आणल्याचं निष्पन्न झालं आहे.

ही "बेनी" नेमकी आहे तरी कोण?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सावंत याच्याकडून जवळपास ६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करताच हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय येताच आरोपिकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली. आरोपी सावंत याची नायजेरियन महिला "बेनी" हिच्याशी ओळख होती. बेनी सावंतशी मोबाईल वरून संपर्क साधायची आणि अमली पदार्थ कोणाकडून घ्यायचे आणि कोणाला द्यायचे याच्या सूचना करत असे. काही दिवसांपूर्वी मूळ पुण्यातील येरवडा भागातील राहणारा सावंतला बेनी चा फोन आला. "दिल्लीला जायचं, सांगेल त्या ठिकाणी एक बॅग असेल ती उचलायची आणि बंगलोर मध्ये जाऊन द्यायची आहे" अशा सूचना दिल्या. त्यानुसार सावंत दिल्लीत पोहचला, त्याला मोबाईल वर एक पत्ता आला. एका जंगल सारख्या निर्मनुष्य ठिकाणी तो पोहचला, तिथे असलेली बॅग उचलली आणि निमूटपणे निघाला.

बेनी ने दिलेल्या सूचनांनुसार ती बॅग त्याला बंगळुरू मध्ये द्यायची होती. दिल्लीवरून बंगलोर ची बस न घेता त्याने पुण्याची बस पकडली. पुण्यातील कात्रज भागात बस थांबली, खाली उतरताच सावंत चे पोलिसांनी "स्वागत" केलं आणि थेट कोठडीत नेलं.

Pune ₹5.79 crore MD drug seizure
Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू

गोल्फ कोर्सचा हमाल ते अमली पदार्थांचा दलाल

सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बंगळुरू सह पुण्यातील विश्रांतवाडी, विमानतळ, येरवडा यासारख्या पोलिस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थांची तस्करी करण्यापूर्वी सावंत "कॅडी" म्हणजेच गोल्फ कोर्स मध्ये हमाल म्हणून काम करत होता. गोल्फरच्या बॅग, क्लब आणि इतर साहित्य एका होलवरून दुसऱ्या होलवर घेऊन जाणे हे सावंत चे प्रमुख कामे असे. मात्र ही नोकरी सोडून त्याने अमली पदार्थांची तस्करी करायला सुरुवात केली.

Pune ₹5.79 crore MD drug seizure
BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

बेनीचा बॉयफ्रेंड ओशी सोबत सावंत ची "जुनी" ओळख

बेनी ही मूळ नायजेरिया देशाची आणि अमली पदार्थांची तस्करी करणे. सावंत ची ओळख बेनी च्या बॉयफ्रेंड शी "जुनी" ओळख असल्याचं आता तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी सावंत याला अटक केल्यानंतर त्याची "कुंडली" तपासली असता त्याच्यावर याआधी सुद्धा अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी बंगळुरू मध्ये गुन्हा दाखल आहे. पुण्यातून बंगळुरू मध्ये "शिफ्ट" झाल्यानंतर सावंतची ओशी नावाच्या नायजेरियन व्यक्तीशी ओळख झाली होती. ओशी सोबत राहून सावंत ने बंगळुरू मध्ये गांजाची तस्करी करायला सुरुवात केली. ओशी गांजा आणून सावंतकडे देत असे आणि तो पुढे इतर पेडलर यांना हस्तांतरित करत. एकेदिवशी त्या दोघांना बंगळुरू पोलिसांनी रंगेहाथ पकडले आणि थेट जेल ची हवा खाऊ घातली. बंगळुरू मधील अमृताहल्ली पोलिस ठाण्यात सावंत विरोधात गुन्हा दाखल आहे.

जेल मधून बाहेर पडल्यावर सावंत ची ओशी ची गर्लफ्रेंड बेनी सोबत ओळख झाली आणि त्यानंतर सावंत हा दोघांचा दलाल म्हणून काम करू लागला. सावंत ने आत्तापर्यंत अमली पदार्थांची तस्करी कुठल्या राज्यात केली आहे? अमली पदार्थांची विक्री मधून आलेल्या पैशांचे काय केले? याचा तपास सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Pune ₹5.79 crore MD drug seizure
crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com